‘केजे’ कॅम्पसच्या माध्यमातून तीन हजारांहून अधिक अभियंत्यांना नोकरीची संधी
Tuesday, Mar 13 2018 7:17AM    Webmirchi News Network

‘केजे’ कॅम्पसच्या माध्यमातून तीन हजारांहून अधिक अभियंत्यांना नोकरीची संधी
पुणे, ता. 12 : येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या संस्थेमार्फत अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या 3000 पेक्षा अधिक अभियंत्यांना नोकरीची संधी देण्यात आली आहे. इन्फोसिस या अग्रणी कंपनीच्या वतीने केजे शिक्षणसंस्थेत भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये देशभरातून 3000 पेक्षा अधिक उमेदवारांनी लेखी व मौखिक परिक्षा दिली.

पुण्यासह महाराष्ट्र आणि विविध राज्यातून हे उमेदवार आले होते. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कंप्युटर, ई अँड टीसी, आयटी आणि इतर शाखेतून अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला होता. त्यातून निवडलेल्या 3000 अभियंत्यांची केजे शिक्षणसंस्थेच्या केंद्रावर लेखी आणि मौखिक परीक्षा घेण्यात आली. यावेळी शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, डॉ. व्यासराज काखंडकी, प्राचार्य डॉ. सुहास खोत, डॉ. विजय वाढई, प्रा. डॉ. प्रकाश डबीर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. प्रमोद दस्तूरकर, प्रा. राहुल उंडेगावकर यांच्यासह इन्फोसिसचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना कल्याण जाधव म्हणाले, “संस्थेच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या अभियंत्यांना नोकरी मिळणार आहे. इन्फोसिससारख्या मोठ्या आणि बहुराष्ट्रीय कंपनीत काम करताना अभियंत्यांनी स्वत:चा उद्योग सुरु करण्याचे स्वप्न उराशी बाळगावे. काही वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्यातील प्रत्येकाने केला पाहिजे. भारताला जागतिक महासत्तेकडे वाटचाल करण्यासाठी कुशल अभियंते व उद्योजक यांची नितांत गरज आहे.” संस्थेचे खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, विभावरी जाधव यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

अधिक माहितीसाठी : 
उचित माध्यम (जीवराज : 9767789529)

  • 3   
  • 0
आपकी प्रतिक्रिया
 
 
   

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Local,   Business Category: NA   Similar News ID: 1000000000


<